Posts

वसंतातील कविता -१

Image
हिवाळ्याचे प्रस्थान होऊन वसंताचे आगमन झाले. वातावरणात उत्साह आहे; आनंद आहे. सोनेरी ऊन्हे, इंद्रधनुष्य, रंगीबेरंगी फुले.....अनेक विहंगम दृश्ये मनाला मोहून टाकत आहेत. तरीही मनाला काही चुकल्या चुकल्यासारखे का वाटावे? थंडीच्या मोसमातील ती अंधारी बोचरी दु:खे तर आठवत नाहीत? खरे आहे... सवयीचा परिणाम. का तेच आपले आस्तित्व आहे, असा मनाने स्वीकार केला आहे? उन्हाळा सुरु झाला आहे खरा.. थोडा उशीरच झालाय ह्या कवितांना. वसंत शुभ्र हिमापरी शुभ्र पाकळ्या कुरबुरती सारख्या सरे हिवाळा तरी पारख्या रंगाविण पोरक्या वसंतातल्या इंद्रधनूचे चाप कुणी ओढले शरसंधाने फुलांवरी मग रंग कुणी सांडले वाऱ्यावरती गंध तरंगे भ्रमर येतसे गात फुले पाकळी, खुलून ये कळी प्रणयाचा संकेत शिशिरातील झोपेतून उठती सृष्टी आणिक धरा स्वप्नांमधली गुजे सांगती मैत्रिणीस सत्वरा सजीव होऊन स्वप्ने मग ती झऱ्यातून वाहती पक्षांच्या गाण्यातून मंजुळ अथवा झंकारती स्वर ते ओले, ऊन कोवळे टिपून घेते मनी जपून ठेवी दृश्य विहंगम मिटूनिया पापणी हिमबिन्दुसम वितळून जाती दु:खे अन वेदना वाहून नेई चिन्ता मनीची खळाळती मेघना होई बावरे, चित्त पुकारे ठेव, नव्हे ओझे दु:...